🕒 1 min read
परभणी : तालुक्यातील पेडगाव महसूल मंडळात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई २९ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे देण्यात यावी. या मागणीसाठी परभणी तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी पेडगाव फाटा येथे परभणी – मानवत राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पेडगाव महसूल मंडळातील सर्व गावातील शेतकरी, भजनी मंडळ सहभागी झाले होते.
यावेळी आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले. या निवेदनात पेडगाव महसूल मंडळातील पेडगाव, स. मि. पिंपळगाव, कष्टगाव, वडगाव, हसनापूर, गोविंदपूर, आर्वी आदी सर्व गावातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर सर्व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना २९ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
२३ दिवस पावसाचा खंड पडलेल्या भागात नियमानुसार तात्काळ पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोग रद्द करून शेतकऱ्यांना पीक विम्याच्या निकषानुसार हेक्टरी ४५ हजार रुपये मंजूर करावेत. या मागण्या या वेळी करण्यात आल्या आहेत. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले, यामध्ये कॉम्रेड राजन क्षीरसागर, माऊली कदम, माणिक कदम, टी. एम.देशमुख आदी सहभागी झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांशी संबंधित आयकर विभागाच्या छाप्यांचा भाजपाशी संबंध जोडणे हास्यास्पद – पाटील
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची दलित संघटनांची मागणी
- उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
- ‘मलिकांच्या जावयांनाही अटक झाली होती, मग मलिकांनाही जबाबदार धरायचे का?’, दरेकरांचा सवाल
- आयकर विभागाच्या छाप्यांबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा; केशव उपाध्ये यांची मागणी

