नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. याआधीच बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या राम रहीमला न्यायालयाने आता रणजीत सिंहच्या हत्येसाठी राम रहीम आणि इतर पाच आरोपींना दोषी ठरवले आहे. रणजीत सिंहची २००२ मध्ये हत्या झाली होती. याप्रकरणी सीबीआयने ३ डिसेंबर २००३ रोजी रणजीत सिंह हत्या प्रकरणात एफआयआर दाखल केला होता. तर रणजीत सिंहचा मुलगा जगसीर सिंह याने न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याप्रकरणी हा खटला इतर सीबीआय न्यायालयात हस्तांतरीत करण्याची मागणी गुरमीत राम रहीम याने केली होती, ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने गुरमीत राम रहीम सिंग आणि इतर पाच आरोपींना कलम ३०२ अन्वये हत्येस दोषी ठरवले आहे. याप्रकरणी शिक्षा १२ ऑक्टोबर रोजी सुनावली जाणार आहे.
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह सध्या हरियाणामधील रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगामध्ये कैदेत आहे. दोन साध्वींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुरुमीत राम रहिमला २०१८ साली २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. याचप्रकरणी सुनारिया तुरुंगात तो शिक्षा भोगत आहे.
महत्वाच्या बातम्या
- साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार; राणेंचा घणाघात
- लवकरचं ‘दूध का दूध पानी का पानी होईल; अजितदादांची प्रतिक्रिया
- ‘आता राष्ट्रवादीवाले बॉलिवूडची पण भांडी घासायला लागले’, निलेश राणेंचा घणाघात
- ‘लखीमपुर घटनेवर मी प्रतिक्रिया दिली या रागातून सत्ताधाऱ्यांनी ‘ती’ कारवाई केली असावी’
- १०५ आमदार असूनही ते एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करतात; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
