Share

१०५ आमदार असूनही ते एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करतात; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांच्या निकालांनंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं म्हटलं होतं. यावरुनच आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. १०५ आमदार असलेला भाजप आता एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे अशी आठवण करुन देताना शिवसेनेनं आकडेमोड समजवून सांगण्याचा प्रयत्न सामनाच्या अग्रलेखामधून केला आहे.

“महाराष्ट्रातील एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून भाजपाने आपली ताकद दाखवली आहे. भाजपाने २२ जागा जिंकल्या याचे दुःख वाटायचे कारण नाही, पण भाजपाने या पोटनिवडणुकांत अनेक जागा गमावल्या आहेत त्याचे काय? विधानसभा निवडणूक निकालातही भाजपा हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यांचे १०५ आमदार निवडून आले, पण १०५ आमदार असलेला भाजप आता एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. तेव्हा जिल्हा परिषद-पंचायत समिती पोटनिवडणुकांच्या निकालाचे विश्लेषण म्हणा किंवा पंचनामा म्हणा, कुणाला काय करायचा तो करू देत, पण विरोधी पक्षाचे म्हणणे जनता मनावर घेणार नाही, असा टोला राऊतांनी लेखामधून लगावण्यात आला आहे.

या निवडणुकीत भाजपनं निर्णय घेतला होता की आमचं स्थानिक नेतृत्व ती निवडणूक लढेल. आम्ही कुणीही प्रचाराला गेलो नाही. तरी जनतेनं सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला निवडून दिलं आहे. २२५ जागांपैकी ५५ जागा म्हणजे २५ टक्के जागा भाजपला मिळाल्या आहेत. २५ टक्के जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्या आहेत. आणि तीन पक्ष एकत्र येऊनही उरलेल्या ५० टक्क्यात ते तीन पक्ष अडकले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात ज्यांची सत्ता आहे, दुर्दैवाने तो शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकाचा पक्ष झालाय. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपवरच जनतेनं विश्वास दाखवला आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. यावर राऊतांनी त्यांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या सोयीने या निकालांचे अर्थ लावीत आहे. आम्हीच कसे ‘मोठे’ किंवा लोकांनी आमच्याच डोक्यावर कसा विजयाचा मुकुट ठेवला असे सांगण्याची चढाओढ सुरू आहे. त्या चढाओढीत भाजपने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असली तरी कागदावरील निकालांचे आकडे खोटे बोलत नाहीत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

ओबीसी आरक्षणाचा फटका बसल्यामुळे राज्यातील सहा जिल्हा परिषदांत पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या. पंचायत समितीच्याही निवडणुका पार पडल्या. पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने १४४ पैकी ७३ जागांवर विजय मिळविला. भाजपास ३३ जागा जिंकता आल्या. आता गणितात कोणत्या आर्यभट्टाने किंवा भास्कराचार्याने ७३ पेक्षा ३३ आकडा मोठा असे सिद्ध केले ते ‘सरशी’वाल्यांनी सांगावे, असा टोला शिवसेनेनं फडणवीसांना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!