🕒 1 min read
औरंगाबाद : गुलाब चक्रीवादळाने मराठवाड्यात दाणादाण उडविली आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातून घास हिरावून घेतला आहे. मात्र आतापर्यंत कोरोना महामारी, गारपीट असो अथवा तोक्ते चक्रीवादळ. या सर्व संकटात थेट मदत ठाकरे सरकारने केली आहे. त्यामुळे मराठवाड्यात आलेल्या अस्मानी संकटात महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना न्याय देईलच, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी बळीराजाला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बाजूने कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात जुने कायगाव, अमळनेर, कणकोरी, पेंडपूर, भोयगव, लखमापूर, कोबापूर आदी ठिकाणी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. गोदावरी, शिवना, नारळी आदी नदीकाठच्या गावासह शेतातील मोठ्या प्रमाणात माती वाहून नुकसान झाले आहे. अनेक घरे, पिके आणि शेतीसाहित्य नदीला जाऊन मिळाले आहे. शेतकरी बांधवांना डोळ्यासमोर नुकसान पाहावे लागेल आहे. त्यामुळे ऐन दसरा-दिवाळीच्या सणाला शेतकरी हवालदिल झाला आहे.
त्यामुळे राज्यसरकारने ग्रामसेवक, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांपासून तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना तातडीने पंचनामे करून प्रशासनाला सादर करण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे शेतकरी बांधवानी न घाबरता, न डगमगता धैर्याने संकटावर मात करावी, असे शिवसेना खैरे म्हणाले. नुकसानीच्या पाहणीदरम्यान उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिलीप निरफळ, उपतालुकाप्रमुख तथा माजी सभापती पोपटराव गाडेकर, तहसीलदार सतीश सोनी आदी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- महिलाविषयक कौटुंबिक कायद्यांच्या जनजागृतीची गरज – यशोमती ठाकूर
- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे’
- ‘महागाईने जनता हैराण झालेली असतानाही मोदी सरकारला जनतेच्या यातना दिसत नाहीत’
- ‘तुझ्यात जीव..’फेम हार्दिक जोशी मालिकेपूर्वी करायचा ‘हे’ काम
- भाजपच्या विचारांना जनतेने नाकारले आहे हे या निकालामधून दिसते – जयंत पाटील


