Share

नवाब मलिकांच्या आरोपावर मनिष भानुशालीचे प्रत्युत्तर; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी करण्यात आली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत भाजपाचे नेते एनसीबी अधिकारी बनून कारवाई करतात असा घणाघाती आरोप केला आहे.

यासंदर्भात आता मनीष भानुशाली यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रेड करतांन तुम्ही तिथे गेले होता का? असे विचारले असता ते म्हणाले की,’आम्ही त्यांना पकडलं नाही. सगळी कारवाई एनसीबीने केली. मी सोबत चाललो होतो. आम्हाला जी माहिती मिळाली होती ती साक्षही नोंदवायची होती म्हणून आम्ही गेलो होतो. देशहिताच जे काम आहे ते आम्ही केले. नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यात तथ्य नाही. भाजपामध्ये माझ्याकडे कुठलंही पद नाही. के. पी. गोसावी कोण आहेत तेदेखील मला माहित नाही’ असे भानुशाली म्हणाले.

दरम्यान, अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असल्याचे त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. हा व्यक्ती कोण? हे एनसीबीने स्पष्ट करावे अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!