Share

‘माझ्या नवऱ्याची..’मधील ‘राधिका’चा नवा अवतार; चाहत्यांचे वेधले लक्ष

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून ‘राधिका’ म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते घराघरात लोकप्रिय झाली. शिवाय तिने महाराष्ट्रातील प्रत्येकांच्या मनावर राज्य केले आहे.अशातच तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

एका गृहिणीपासून ते एक यशस्वी आणि जबाबदार व्यावसायिका बनून तिने प्रत्येक सामान्य स्त्रीला तिच्यात असणाऱ्या एका असामान्य शक्तीची ‘माझ्या नवऱ्याची..’ या मालिकेतून जाणीव करून दिली होती. तिच्या मालिकेने जरी निरोप घेतला असला तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी आजही जोडून आहे. ती अनेकवेळा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CUfJ2WiM9yk/?utm_medium=copy_link

अनिताने काही फोटो शेअर केले असून या फोटोमध्ये ती जिन्स आणि पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये तिने सगळे केस मागे बांधले आहे. यात ती खूपच वेगळी परंतु सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. तिच्या या फोटोवर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तिच्या चाहत्यांना तसेच अनेक कलाकारांना देखील तिचा हा लूक खूप आवडला आहे. या फोटोवर अभिजित खांडकेकर, नंदिता पाटकर, ईशा केसकर, मृण्मयी गोडबोले यांनी कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक केले आहे. अनिताने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘जोगवा’, ‘तुंबाड’, ‘सनई चौघडे’, ‘पोपट’, ‘अय्या’, ‘द स्मेल’, ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटात काम केले आहे. तिचा अभिनयाचे चाहतावर्ग ही खूप मोठा आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!