Share

‘तुझ्यात जीव..’फेम हार्दिक जोशी मालिकेपूर्वी करायचा ‘हे’ काम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : छोटया पडद्यावरील लोकप्रिय ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून लाडका ‘राणादा’ म्हणून सर्वपरिचित झालेला अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. त्याने अभिनय आणि त्याच्या व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांच्या घराघरात पोहंचला. आज (६ ऑक्टोबर) हार्दिक त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने त्याच्याबद्दल काही रोचक गोष्टींची माहिती घेऊ या.

हार्दिकचा जन्म पुण्यात झाला, २००९ साली मुंबईतील गुरुनानक खालसा कॉलेज आर्ट्समधून हार्दिकने त्याचे शिक्षण पूर्ण केले. त्या लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. शाळा कॉलेजमध्ये तो नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायचा. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने अभिनयाचे क्षेत्र करिअर म्हणून निवडले आणि तो मुंबईत आला. सुरुवातीच्या काळात त्याने २०१२ साली स्टार प्रवाहाच्या ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मालिकेत एक छोटीशी भूमिका केली. मात्र त्या भूमिकेने त्याला जास्त फायदा झाला नाही. पुढे तो अशा अनेक लहान भूमिकांमध्ये दिसला. त्याने मकरंद अनासपुरे यांच्यासोबत ‘रंगा पतंगा’ या चित्रपटात ‘एसीपी पाठक’ची भूमिका साकारली होती.

दरम्यान हार्दिकने अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ ह्या सिनेमाच्या टायटल सॉन्गमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याकडून त्याने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. हिंदीत मनासारख्या भूमिका मिळत नसल्यामुळे हार्दिक मराठी मालिकांकडे वळला. हार्दिकने ‘अस्मिता’, ‘राधा ही बावरी’, ‘दुर्वा’ यासारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच इतकंच नाही तर त्याने’ क्राईम पेट्रोल’ या कार्यक्रमातही छोटेखानी भूमिका केली आहे.

शूटिंग संपल्यानंतर नियमितपणे जिमला जातो. तसेच योगाला प्राधान्य असून डाएटवर देखील खूप लक्ष देतो. नुकतच त्याने कोल्हापूर बदाम थंडाई’ असं त्याच्या ब्रॅण्डचं नाव आहे. सोशल मीडियावर त्याने या व्यवसायाची माहिती देताना लिहिली होती. सध्या हार्दिक झी मराठीच्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. भविष्यात त्याला ऍक्शन सिनेमे करायला आवडतील. त्याला सलमान आणि जॉन अब्राहमसोबत काम करायचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!