Share

‘माझ्या खासदारकी बाबत काही जण चर्चा करीत आहेत पण आमदारकी जिंकल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

कागल  – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे आदर्श कागल उभारण्याचे स्वप्न स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी पाहिले होते. माझाही तोच प्रयत्न आहे. कागलच्या कुरुक्षेत्रात आपणास आमची वाटचाल विकासाच्या मुद्द्यावरच राहील.आजचे तरुण स्वावलंबी झाले पाहिजेत,नोकऱ्या मागणाऱ्या तरुणापेक्षा नोकऱ्या देणारे देणारे तरुण निर्माण झाले पाहिजेत यासाठी मला सर्वांची साथ लागेल.असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

ते पुढे म्हणाले,यापुढे तरुणांना राजे बँकेच्या माध्यमातून व्यवसायिक कर्जाच्या स्वरूपात आर्थिक पाठबळ देऊन व त्यासाठीचे प्रशिक्षण देऊन छोटे मोठे उद्योजक निर्माण करावयाचे आहेत. स्थानिक उद्योग धंद्यांचे प्रशिक्षण देणेसाठी पुण्यातील सारथी संस्थेबरोबर आपण टाय-अप केले आहे.त्याअनुषंगाने पुण्यातील दलित संघटना,(डिकी),सारथी,राजे बँक आणि शाहु साखर कारखाना
या सर्वांना एका छताखाली आणून सुरक्षित कागल,आदर्श कागल,बनवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कागल तालुक्यामध्ये समाजकारण व सुसंस्कृत राजकारण केले. मात्र काही जणांनी त्यांची थट्टा केली .मात्र राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श समोर ठेवून करीत असलेल्या त्यांच्या या कार्यपद्धतीचा मला अभिमान आहे.तोच वारसा मी पुढे चालवीत आहे. कागल तालुक्यातील युवकांना मला स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे.त्यांना कोणाच्या दारात जायला लागू नये इतके सक्षम व स्वावलंबी करायचे आहे. आज,खरच! कागलची वाटचाल आदर्श कागल च्या दृष्टीने सुरू आहे का? हा प्रश्न पुढे येत आहे.त्यामुळे कागल तालुक्याची पाठराखण करण्याची आणि कागल तालुका सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आता युवा पिढीवर आहे.त्यासाठी मी तरुणांचे बरोबर कायमपणे राहणार आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, मी वारंवार दिल्लीला जात असल्यामुळे माझ्या खासदारकी बाबत काही जण चर्चा करीत आहेत. मी दिल्लीला जातो यासाठीच केंद्र सरकारच्या अनेक योजना लोककल्याणकारी आहेत त्या आणण्यासाठी. मात्र आमदारकी जिंकल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही.अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्तपणे दाद दिली. बिद्री साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब पाटील म्हणाले, गुणवत्तापूर्ण काम हीच राजे गटाची ओळख आहे. सातत्याने चांगले काम करीत राहिल्यावर यश मिळाल्याशिवाय रहात नाही.

गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील म्हणाले, अगदी कमी कालावधीमध्ये समरजितसिंह घाटगे यांनी स्व. विक्रमसिंहजी घाटगे यांचा नावलौकिक वाढविला आहे. गेल्या दोन वर्षाच्या अडचणीच्या काळात ही त्यांनी तरुण व समाजाला आधार देण्याचे काम केले आहे. त्यांच्यात जशास तसे उत्तर देण्याची धमक आहे.भविष्य ते आमदार तर होतीलच पण मंत्री सुद्धा होतील. त्यांची कामाची पद्धत पाहता राज्याच्या राजकारणात ते निश्चितच पुढे जातील. असे नेतृत्व आपण वाढवूया असे ते म्हणाले.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!