🕒 1 min read
जालना : जिल्ह्यातील घनसावंगी इथल्या युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्य सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. पंचनामे न करता सरसकट मदत घोषीत करावी, अशी मागणी या वेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे बैलगाडी, ट्रॅक्टर यांचाही या मोर्चामध्ये सहभाग होता.
युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी या मोर्चामध्य सहभागी झाला नव्हता. शेतकऱ्यांना हेक्टर ५० हजार रुपयांची तर फळबागेला एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. शेतकऱ्यांना ही मदत तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील पिक पूर्णपणे हातातून गेले आहे. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी जमीन खरडून गेल्याने याचे दूरगामी परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहेत. यामुळे सरकारने जास्तीत जास्त मदत करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंमली पदार्थाच्या विक्रीविरोधात भाजप आमदारांचा मोर्चा
- अभिनेता परेश रावल ‘omg 2’ चित्रपटात दिसणार नाही.., कोण साकारणार ‘ही’ भूमिका?
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट
- ‘शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशमधील सरकार करत आहे’
- सोमय्यांना मोठा दिलासा; मानहानीच्या खटल्यात अखेर जामीन मंजू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
