🕒 1 min read
औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी खुलताबाद तालुक्यातील सराई शिवारात बैलगाडीवर नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. लवकरच केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली तसेच सरसकट आर्थिक मदतीची मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.
यावेळी नुकसानग्रस्त भीमराव खंडागळे, दिनेश अंभोरे यांच्या पिकांच्या पाहणीसाठी जातांना रस्त्यावर चिखल साचलेला होता. जिल्हा सरचिटणीस संजय खंबायते त्यानंतर त्यांनी बैलगाडीतून शेत गाठले आणि ज्येष्ठ शेतकरी युवराज नागे यांच्याशी संवाद साधला. यावेळी शेतकर्यांनी आपली करून कहाणी त्यांच्यासमोर मांडली. खरीपाचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. विहिरी पडल्या. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी.
अशी मागणी शेतकरी करत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांची पिके अतिपावसामुळे पाण्यात गेली आहे. कापूस, मका, सोयाबीन, आद्रक, भुईमूग, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून, पावसामुळे हाताशी काढणीस आलेले पिके पावसामुळे हिरवली आहेत. अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी कराड यांच्याकडे केल्या. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, पंचायत समितीचे सभापती गणेश अधाने, उपसभापती युवराज नागे, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- अंमली पदार्थाच्या विक्रीविरोधात भाजप आमदारांचा मोर्चा
- अभिनेता परेश रावल ‘omg 2’ चित्रपटात दिसणार नाही.., कोण साकारणार ‘ही’ भूमिका?
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी संजय राऊत घेणार राहुल गांधींची भेट
- ‘शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशमधील सरकार करत आहे’
- सोमय्यांना मोठा दिलासा; मानहानीच्या खटल्यात अखेर जामीन मंजू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
