Share

‘खोटे बोल पण रेटून बोल’ देवेंद्र फडणवीसांच्या लातूर दौऱ्यावर काँग्रेसची टीका

Published On: 

🕒 1 min read

लातूर : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी टीका केलीय. ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ अशी देवेंद्र फडणवीस यांची भूमीका असल्याचे निलंगेकर यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, ‘महाआघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, खरडन जमीन, नदीकाठच्या जमिनी, १०० टक्के नुकसानग्रस्त जमिनी अशा तीन प्रकारचे पंचनामे आणि अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. निश्चितचपणे महाआघाडी सरकार सणासुदिच्या तोंडावर शेतकऱ्यांपर्यंत मदत पुरवेल. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी शासकीय पैशातून दौरे करून होणारी पैशाची उधळण थांबवावी.’

निलंगेकर यांनी औराद इथल्या मांजरा–तेरणा नदीच्या संगमावरील पुरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळला नाही. त्यामुळे त्यांनी खोटे बोलू नये असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे ‘खोटे बोल पण रेटून बोल’, असा प्रकार सध्या देवेंद्र फडणवीस करत असल्याचे अशोक पाटील निलंगेकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!