Share

रोहित शर्माचा ‘तो’ प्रँक व्हिडिओ झाला व्हायरल; मात्र घारबली होती पत्नी रितिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकीकडे मुंबई इंडियन्सच्या संघाच्या आकडेमोडीचं टेन्शन असतानाच दुसरीकडे रोहित शर्माने सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओ रोहित त्याच्या पत्नीला घाबरवणारा एक ‘प्रँक’ करताना दिसतोय.

रोहितने इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून, या व्हिडीओमध्ये रोहितची पत्नी रितिका सजदेहसुद्धा दिसत आहे. व्हिडीओ रोहितच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. सध्या हे दोघेही दुबईमध्ये असून आयपीएलनंतर टी २० विश्वचषक स्पर्धा संपेपर्यंत हे दोघेही तिथेच असणार असल्याचं सांगण्यात येतंय.

https://www.instagram.com/reel/CUmepdnDy0Y/?utm_medium=copy_link

या व्हिडीओमध्ये रोहित त्याच्या पत्नीला घाबरवताना दिसतोय. रोहितने स्वत:च हा व्हिडीओ शेअर केलाय. रोहित व्हिडीओच्या सुरुवातीला आपल्या डाव्या हातामध्ये चॉकलेट ठेवतो आणि मूठ झाकतो. त्यानंतर तो रितिकाजवळ जातो आणि तिला मूठ उघडण्यास सांगतो. मात्र रोहितने हातामध्ये काहीतरी भयानक गोष्ट लपवल्याची भीती रितिकाला वाटते. रोहित तिला त्याच्या हाताची मूठ उघडण्यास सांगतो. ‘तुम्हाला वाटतंय का मी रितिकाला घाबरवतोय?, शप्पथ सांगतो केवळ एकदा माझ्या हाताला हात लाव.’ अखेर रितिका घाबरतच रोहितच्या हातावर मारते आणि तो मूठ उघडतो तर हातात एक चॉकलेट दिसतं,हे पाहून ती देखील स्मित हास्य करते. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत अकाऊंटवरुनही या व्हिडीओवर कमेंट करण्यात आलीय. आम्हाला प्रँकस्टर रोहित आवडला असं या कमेंटमध्ये म्हटलंय. सध्या हे दोघेही दुबईमध्ये आहेत. टी २० विश्वचषक स्पर्धा संपेपर्यंत हे दोघेही तिथेच असणार आहेत.

दरम्यान मुंबई इंडियन्सच्या संघाला आयपीएलच्या उर्वरित पर्वामध्ये आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ जेतेपदापासून सध्या तरी फार दूर दिसत आहे. असं असलं तरी रोहित शर्मा त्याच्या संघ सहकाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. उरलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये मोठे विजय मिळवून अंतिम चारमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी रोहितचा संघ प्रयत्न करत आहे. गुणतालिकेमध्ये नेट रनरेट वाढला तरच मुंबईला चौथ्या स्थानापर्यंत झेप मारुन प्लेऑफसाठी जागा निश्चित करता येईल. सध्या मुंबई आणि पंजाब दोन्ही संघाचे प्रत्येकी १० अंक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!