🕒 1 min read
देगलूर – महाविकास आघाडीच्या पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले म्हणून पोलिसांकडून शिवसैनिकांना लाथांनी तुडविण्यात आले. शिवसैनिकांचा अपमान करण्यात आला. हे आपल्याला सहन झाले नाही. त्यामुळे अनेक शिवसैनिकांसह आपण भाजपामध्ये प्रवेश केला असल्याचा पुनरुच्चार भाजप उमेदवार सुभाष साबणे यांनी केला आहे.
पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना साबणे म्हणाले,भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे. राज्यात भाजपा शिवसेना युतीचे सरकार असताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरुपाची मदत मिळाली. मतदारसंघात रस्त्यांची कामे झाली. पण गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आणि विम्याचेही पैसे मिळत नाहीत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठीही पालकमंत्री येत नाहीत असा आरोप देखील त्यांनी केला.
दरम्यान, या मेळाव्यात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पार्टी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक जिंकेल आणि विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या राज्यातील महाविकास आघाडीला दाखवून देईल की, तुम्ही कितीही पक्ष एकत्र आलात तरी भाजपा, रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य मिळून आम्ही विजयी होऊ. या मतदारसंघातील भाजपाच्या विजयाने राज्यातील राजकीय परिवर्तनाचा वेग वाढेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी देगलूर येथे व्यक्त केला.
यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. राजेश पवार, आ. तुषार राठोड, नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील गोजेगावकर, नांदेड शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, माजी आ. गंगाराम ठक्करवाड आणि भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछेडे उपस्थित होते. मेळाव्याला पक्षाचे बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख आणि पन्ना प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- घटस्थापनेला राज्यभर आनंदोत्सव साजरा करत दर्शनाला जाणार – आचार्य तुषार भोसले
- ‘निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा’
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
