Share

डोंबिवली पीडितेच्या कुटुंबीयांना ठाकरे सरकारने २० लाखांची मदत द्यावी-रामदास आठवले

Published On: 

ठाणे : डोंबिवलीतील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण गंभीर आहे. या पीडितेच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने २० लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ३३ आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशीही मागणी आठवले यांनी केली.

केंद्रीय मंत्री आठवले यांनी आज डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन डोंबिवली बलात्कार प्रकरणासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आठवले यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश दिला आहे. डोंबिवलीतील नागरिकांनी पुढे येऊन या पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, असे आवाहन आठवले यांनी केले.

दिल्लीतील निर्भया प्रकरणावेळी मी संसदेत होतो. अशा गंभीर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असा कायदा केंद्र सरकारने केला आहे. पण, डोंबिवली प्रकरणातील ३३ आरोपींना फाशी व्हावी. येत्या सहा महिन्यांत हे प्रकरण ‘जलदगती न्यायालयात’ चालवून आरोपींना शिक्षा दिली जावी. या घटनेचा पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या वतीने निषेध करतो, असेही आठवले यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!