मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. महापुराची कारणे शोधताना पर्यावरण अभ्यासक आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी योजना जलयुक्त शिवाराकडे बोट दाखवत आहेत. जलयुक्तच्या कामामुळे नद्यांशी मोठ्या प्रमाणात छेडछाड केल्याने पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला आहे.
देऊळगावकर म्हणाले, जलयुक्त शिवारच्या कामात नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणे हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे होते. असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान याच मुद्द्याला धरून आता भाजपला त्यांच्या विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केली असल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान आता यावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘जलयुक्त योजनेतील सगळीच कामे चुकीची झाली असतील असे नाही त्यातील काही कामे झाली असतील. जलयुक्त योजना ही लोकउपयोगी आणि सकारात्मक योजना होती. मराठवाडा विदर्भातील जलयुक्त योजनेत निर्माण करण्यात आलेल्या पात्राच्या बाहेर पाणी आलं आहे. काही ठिकाणी पाणी स्वतःचे पात्र सोडून तीन किलोमीटरपर्यंत पसरले आहे. हे देखील पाहणे गरजेचे आहे. असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
तसेच जलयुक्त योजनेत पाण्याचा मुख्य प्रवाह बदलला असल्यामुळे मराठवाड्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. यावर पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे की, ‘जलयुक्त योजनेत नैसर्गिक प्रवाह बदलण्याची कुठेही परवानगी नाही. ज्या नद्या आहेत त्याचे खोलीकरण करणे, बंधारा बांधण्याची तरतूद करण्यात आली आहे. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याची कोणत्याही योजनेत परवानगी देण्यात आली नाही.’ असे स्पष्ट मत यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करूनच मराठवाड्यात यावे’, आ.राणा पाटलांचा हल्लाबोल
- ‘इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील’, मनसेचा राष्ट्रवादीला टोला
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- ‘अपमान झालाय, आता काँग्रेसमध्ये राहणारच नाही’, अमरिंदर सिंग यांची घोषणा
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला


