Share

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; गृह खात्याच्या उपसचिवांना ईडीचे समन्स

Published On: 

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख व तत्कालिन एपीआय सचिन वाझे यांच्या संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने गृहखात्याचे उपसचिव कैलास गायकवाड यांना समन्स बजावले आहे. कैलास गायकवाड यांना आज चौकशीसाठी ईडीने हजर रहाण्यास सांगितले. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांनाही समन्स बजावले होते, मात्र ते कुणीही ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यातच आता गृहखात्याच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यालाच ईडीने चौकशीसाठी बोलावल्याने देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहीले होते. त्या पत्रात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी एपीआय सचिन वाझे यांच्यावर १०० कोटी वसूलीचा आरोप केला होता. तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठीही पैसे घेतल्याचा आरोप होता. या पत्राने देशाच्या राजकारणात भूकंप झाला होता. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायालयाने सबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

 

परमबीर सिंहांनी देश सोडल्याचा संशय

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून गेल्याची शंका राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच राज्य सरकारने व्यक्त केली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात अँटिलिया स्फोटक तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अनेकदा समन्स बजावूनही परमबीर यांचा कुठेही पत्ता नाही. यामुळे परमबीर सिंग अटकेपासून वाचण्यासाठी देश सोडून फरार झाले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे. गृहविभाग मे महिन्यापासून परमबीर सिंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबई आणि ठाण्यात एकूण पाच एफआयआर दाखल असून यापैकी तीन प्रकरणांचा तपास सीआयडी करत आहे. सीआयडी आणि ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!