Share

कोहलीसेनेचा ‘विराट’ विजय; राजस्थान रॉयल्सवर ७ गडी राखून मात

Published On: 

अबुधाबी : दमदार फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह बेंगळुरूने 14 गुण मिळवून अंतिम चार मधले स्थान जवळपास पक्केही केले आहे. आयपीएलच्या 43 व्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले.

राजस्थानने विजयासाठी दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना बेंगळुरूने कोहली व देवदत्त पडीक्‍कलच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकला. पडीक्‍कल 22 धावांवर बाद झाला तर कोहलीही 25 धावांवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. कोहली नंतर मात्र, भरत आणि मॅक्‍सवेल यांनी आरसीबीचा डाव सावरला. भरत अर्धशतक करण्यापूर्वीच बाद झाला. त्यानंतर मात्र मॅक्‍सवेलने आपले अर्धशतक 30 चेंडूत 6 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने पूर्ण केले. तर एबी डीविलियर्सच्या साथीत संघाचा विजय साकार केला.

नवोदित वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने अखेरच्या षटकात घेतलेले तीन बळी तसेच त्याला सुरेख साथ देताना यजुवेंद्र चहल व शाहबाज अहमदने केलेली अचूक गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा डाव 20 षटकांत 9 बाद 149 धावांवर रोखला.

राजस्थानचे सलामीवीर इव्हान लेविस व यशस्वी जयस्वाल यांनी संघाला उत्तम सुरुवात करून दिली. दोघांनी 77 धावांची सलामी दिली. जयस्वाल 31 धावांवर बाद झाला. त्याने 22 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार फटकावले. तर लेविसने आपले अर्धशतक साकार केले त्याने 37 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी साकारली. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसननेही चांगली सुरुवात केली मात्र, तो पुन्हा अपयशी ठरला 19 धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर ख्रिस मॉरीसचा 14 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!