🕒 1 min read
पुणे : अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगून अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. यातील अनेक परीक्षार्थींची घरची परिस्थिती ही बेताची असते. मात्र, म्हणतात ना सोनं जेवढं गरम करून कारागीर कोरीव काम करतो तेवढं ते अधिक सुंदर बनतं. तसंच, अधिक संकटे, कष्ट या विद्यार्थ्यांना आयुष्यात मोठी झेप घेण्यासाठी खास बनवतं. कोरोनाच्या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं.
नुकताच, महाराष्ट्र राज्यसेवा अयोग म्हणजेच MPSC च्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. सन २०१९ रोजी झालेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये यश मिळवलेल्या सर्वच उमेदवारांचे कौतुक केले जात असून त्यांचे स्वप्न सत्यात उतरत आहेत. अशा उमेदवारांच्या अनेक यशोगाथा आता समोर येत आहेत.
पुण्यातील पर्वती दर्शनमध्ये वडील सफाई कर्मचारी असलेल्या मोनिका कांबळे हिने स्पर्धा परीक्षेमध्ये सलग चौथ्यांदा यश संपादन करीत तहसीलदार पद मिळवले आहे. यापूर्वी 2018 मध्ये कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी(उप मुख्याधिकारी) तर 2019 मध्ये राज्य विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली होती. 2020 मध्ये उपशिक्षण अधिकारी म्हणून निवड झाली, तर काल लागलेल्या निकालानुसार मोनिकाच्या तहसीलदार पदी निवड झाली आहे. पार्वती दर्शन येथील वसाहतीमध्ये राहणाऱ्या मोनिकाने सलग चौथ्यांदा मोठं यश मिळवल्याने नक्कीच ती अनेकांना स्फूर्ती देईल.
‘या यशावर न थांबता जिल्हाधिकारी होणार’
मोनिका कांबळे हीने एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत, ‘जिद्दीने व प्रामाणिकपणे कठोर अभ्यास केल्यास यश हमखास मिळते.हे मी अनेकदा दाखवून दिले आहे.घरचा पाठिंबा असेल तर कोणालाही यश संपादन करता येते.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत खचून न जाता सातत्याने जिद्द व चिकाटीने अभ्यास केल्यास हमखास यश मिळवले शक्य आहे हे मी करून दाखवले आहे.सद्या राज्य कर निरीक्षक म्हणून येरवडा जीएसटी ऑफिसमध्ये रुजू असून यापुढे असाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेऊन यूपीएससी परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे माझे स्वप्न आहे,’ असं म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकरी संकटात, पोकळ आश्वासनांची नव्हे तर तातडीच्या मदतीची गरज; फडणवीसांची कळकळीची विनंती
- ठाकरे सरकारनं ऐकलं ! ‘त्या’ विद्यार्थ्यांसाठी सीईटी प्रवेश परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- भुजबळांना भेटलोही नाही; अंडरवर्ल्ड डॉन धमकीप्रकरणी निकाळजे यांचा दावा
- सरकारचा सावळा गोंधळ सुरूच; आता आणखी एका परीक्षेची तारीख बदलली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
