Share

भुजबळांना भेटलोही नाही; अंडरवर्ल्ड डॉन धमकीप्रकरणी निकाळजे यांचा दावा

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे नागरी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी भुजबळ यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

छगन भुजबळांविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचा दावा करत आमदार सुहास कांदे यांनी पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे. याप्रकरणी आता अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांचा पुतण्या आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) युवा विंगचे प्रदेश अध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी कांदे यांचा आरोप फेटाळला आहे.

‘आमदार सुहास कांदे यांचे भाऊ टोलनाका चालवतात. या टोलनाक्यावर आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. त्यासाठी मी सुहास कांदे यांना फोन केला होता. त्यांना फोनवर मी कुठलिही धमकी दिली नाही. छगन भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या, असे म्हणालो नाही. मी कधीही मंत्री छगन भुजबळ यांना भेटलो सुद्धा नाही. त्यामुळे मी आमदारांचीच तक्रार करणार आहे. त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहे. त्यांनी लोकप्रियतेसाठी हे केले. माझा भुजबळांचा काहीही संबंध नाही,’ असं अक्षय निकाळजे यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ या प्रकरणी काय म्हणाले ?

आमदाराला धमकी येणं ही बाब गंभीर आहे. मंत्रीमंडळाची बैठक सुरू असताना याबाबत कळल्यानंतर आपण यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माहिती दिल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्रातील कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचे प्रकार राज्य सरकार सहन करणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, असं भुजबळ म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!