🕒 1 min read
औरंगाबाद : मतदार संघातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील सिंचन सुविधेच्या बळकटीकरणासाठी प्रभावी नियोजन करा. तसेच मतदारसंघात अधिकच्या सिंचन सुविधा निर्माण करणे व पूर्वीच्या सिंचन प्रकल्पाचे दुरुस्ती करण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करून शासनास प्रस्ताव सादर करा असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील विविध विकास कामे व प्रश्नासंदर्भात सोमवार ( दि. २७) जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय यंत्रणेची बैठक संपन्न झाली. भराडी प्रकल्प रद्द झाल्यामुळे पूर्णा नदीवर सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी फेर नियोजन करून पूर्णा नदीवर बंधारे उभारण्यासाठी सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिल्या. अजिंठा खोऱ्यात पाणी अडविण्यासाठी नैसर्गिक साधने उपलब्ध आहेत.
शिवाय यासाठी कोणतीही जमीन संपादित करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अजिंठा खोऱ्यात तातडीने सर्वेक्षण करून सविस्तर आराखडा तयार करा. येथे पाणी अडविल्यास लिफ्ट इरिगेशनने या भागात पाण्याची उपलब्धता करता येईल. यासाठी अजिंठा येथील निजाम कालीन बंधाऱ्यांची देखभाल व दुरुस्ती करणे तसेच अजिंठ्याच्या खोऱ्यात अधिक सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वेक्षण कामाला सुरुवात करावी यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे सत्तार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राहुल गांधींकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करत मोदींवर टीका; ‘सावरकरांचे लिखाण वाचाल तर..’
- ‘मुख्यमंत्र्यांचे कोकणातील आश्वासन अजून हवेतच आणि आता मराठवाड्यासाठी नव्या वाफा…’
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- आम्ही बांधावर गेलो तेव्हा सत्ताधारी बांधावर गेले; पंकजा मुंडेंचा सरकारवर निशाणा
- अस्मानी संकट ! अतिवृष्टीने 436 नागरिकांनी जीव गमावला, तर 196 जणांचा वीज पडून मृत्यू

