Share

त्रिसदस्यीय प्रभाग रचनेस रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध – रामदास आठवले

Published On: 

मुंबई  :  राज्य सरकारने नुकताच प्रभाग पद्धती बाबतचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत असणार आहे. तर, मुंबईत केवळ एक सदस्याचा वॉर्ड असेल, असे राज्य सरकारने जाहीर केलं आहे. यामुळे पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.

दरम्यान, या निर्णयाला काही प्रमाणात आता विरोध होताना दिसत आहे.  मुंबई महापालिका वगळता इतर सर्व महापालिकांमध्ये महाविकास आघाडी सरकार ने त्रिसदस्यीय प्रभाग रचना लागू करण्याचा घेतलेला निर्णय लोकशाही विरोधी आहे. छोट्या पक्षांना त्यांच्या उमेदवारांना निवडणूक लढण्याची समान संधी ला हरताळ फासणारा निर्णय आहे. त्यामुळे नगरपालिका असो की महापालिका राज्यात सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत एक प्रभाग एक सदस्य अशीच प्रभाग रचना ठेऊन निवडणूक घ्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

मुंबई शिवाय अन्य महापालिकांमध्ये एक प्रभाग तीन सदस्य ही रचना अत्यंत चूक आहे. नगरपालिका नगर परिषद,महापालिका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक प्रभाग एक सदस्य अशीच रचना असावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत एक प्रभाग एक सदस्य अशी रचना असून हीच पद्धत योग्य आहे. एका प्रभागाच्या निवडणुकीत एका मतदाराला तीन तीन जणांना मत देण्यास लावणे चूक आहे.एक प्रभाग तीन सदस्य या रचनेस रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध असून या निर्णयाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनर्विचार करावा अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असून त्याबाबत चे पत्र आपण मुख्यमंत्र्यांनी लवकर पाठविणार आहोत असे   रामदास आठवले यांनी संगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!