🕒 1 min read
मुंबई : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती उद्भवली आहे. जवळपास २५ लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. मराठवाड्यातील नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून नुकताच घेतला.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे असून सर्वोतपरी मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आणि आज मराठवाड्यातील सर्व पालकमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांना विविध सुचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
सध्या सुरु असलेल्या बचाव कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत, सततच्या पावसाने अनेक फळबागांचेही नुकसान झाले आहे, शेतातील पिके वाहून गेली आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
कोकणाला दिलेली आश्वासने अजून हवेतच आहेत. मराठवाड्यासाठी या नव्या वाफा… pic.twitter.com/WpdrEF3qxI
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 29, 2021
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनावर आता भाजपकडून शरसंधान साधण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोकणातील महापुरावेळी दिलेलं मदतीचं आश्वासन पूर्ण न केल्याचं म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘कोकणाला दिलेली आश्वासने अजून हवेतच आहेत. मराठवाड्यासाठी या नव्या वाफा…’ अशी खोचक टीका भातखळकर यांनी ट्विटद्वारे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर आमचाही नाइलाज होईल; जयंत पाटलांनी शिवसेना आणि काँग्रेसला दिला थेट इशारा
- ‘भाजप नेत्यांची यादी देतो, त्यांच्यावर ईडी कारवाई करणार का?’, जयंत पाटलांचे आव्हान
- ‘सिद्धू हे दिशाहीन मिसाईल, पंजाबला वाचवायचं असेल तर त्यांनी मुंबईला निघून जावं’
- ‘शिव भोजन थाळी योजनेत मोठा भ्रष्टाचार; फुकटची थाळी खाणारे महाविकास आघाडीचेच कार्यकर्ते’
- शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजारांची मदत द्या, ड्रोनद्वारे पंचनामे करा – बावनकुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
