Share

भायखळा तुरुंगातल्या तब्बल 39 जणांना कोरोनाची बाधा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – मुंबईच्या भायखळा तुरुंगातल्या 39 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. इथल्या महिलांसाठीच्या तुरुगांत गेल्या 10 दिवसांत 6 मुलांसह 39 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली आहे. यात गर्भवती महिलांचाही समावेश आहे. यापैकी 36 जणांना नजिकच्या शाळेतल्या कोरोना केंद्रात तर ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोरोनाबाधित गर्भवतींनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात तुरुंगात घेण्यात आलेल्या कोरोना चाचणीदरम्यान या कैद्यांना लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर रुग्णांनाही उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे अशी माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 3 हजार 292 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची एकंदर संख्या 63 लाख 64 हजार 27 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर 97 . 24 शतांश टक्के आहे. राज्यात काल कोरोनाच्या 3 हजार 2शे 6 नव्या रुग्णांची भर पडली तर कोविड-19 मुळे 36 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत एकंदर 1 लाख 38 हजार 870 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोनाचा मृत्यूदर 2 .12 टक्के आहे. सध्या राज्यात एकंदर 37 हजार 860 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!