🕒 1 min read
पुणे : आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे वेळी तसेच खासदार संभाजीराजे छत्रपती हे पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पुण्यात त्यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीचा किस्सा सांगितला. त्यांना लोकांनी साडे तीन लाखांच्या मताधिक्क्याने कसं निवडून दिलं याचं गुपितच सांगितलं आहे.
एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी निवडणुकीतील विजयाचा किस्साच सांगितला. निवडणुकीत दरम्यान आजारी असतानाही मी साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून आलो. निवडून आल्यावर मी विजयाचा प्रमाणपत्रं घ्यायला गेलो होतो. त्यावेळी अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकर सोबत होते. मला एवढं मोठं मताधिक्य पडल्याने लोणीकरांना मोठा प्रश्न पडला. एकही सभा न घेता दानवे एवढ्या फरकाने कसे निवडून आले? असा सवाल लोणीकरांनी खोतकरांना केला. त्यावर, लोकांना वाटले असेल हा लई सीरियस असेल. शेवटचं मत देऊन टाकावं. म्हणून निवडून आले असतील, असं खोतकरांनी सांगितलं. दानवे यांनी हा किस्सा ऐकवताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
निवडणुकीचा किस्सा सांगितल्यावर रावसाहेब दानवेंनी राजकारणाबाबत भाष्य केलं आहे. ‘केवळ राहणी, बोलणं, वागणं अन् व्यवहार नीट ठेवला तर राजकारणात कोणीही पुढं जाऊ शकत’, असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, या सभेत असा कुणी माणूस आहे का फाटलेला शर्टाचा.. बघा माझा शर्ट इथे फाटलाय, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी भर मंचावर आपला फाटलेला शर्ट दाखवला.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात-आ.सतिश चव्हाण
- आता महाविद्यालये देखील सुरु होणार; उदय सामंत यांनी दिली माहिती
- देशात धर्माच्या नावावर दिली जाणारी अफूची गोळी सर्वांवर परिणाम करत आहे – छगन भुजबळ
- मी नरेंद्रजींना म्हणालो, आपल्यावर नक्की गुन्हा दाखल होईल; फडणवीसांचे मिश्किल विधान
- मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
