Share

ओबीसी आरक्षण : केंद्राच्या कोर्टातील भूमिकेनं आरक्षण विरोधी भाजपचा चेहरा उघड झाला – वडेट्टीवार

Published On: 

 मुंबई – ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पॅरिकल डेटावरून केंद्र आणि राज्यातली लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टातील प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारची डेटा देण्यासंदर्भातली तयारी दिसत नाही. प्रशासकीय कारणं आणि त्रुटींचा हवाला देत इम्पॅरिकल डेटा देण्यास केंद्रानं नकार दिला आहे. केंद्राच्या या प्रतिज्ञापत्रावर रिजाँईंडर दाखल करण्यासाठी राज्य सरकारने चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. चार आठवड्यानंतर या प्रकरणावर पुढची सुनावणी होणार आहे.

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्दा राज्यात चांगलाच पेटला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील या ओबीसी आरक्षण संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. राज्य सरकारने केंद्राकडून इम्पॅरिकल डेटा  मागितला होता. दरम्यान, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतित्रापत्रावर आम्ही कॅव्हेट दाखल करणार असल्याचं म्हटलंय. केंद्राच्या कोर्टातील भूमिकेनं आरक्षण विरोधी भाजपचा चेहरा उघड झालाय, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत. 65 पानांच्या प्रतिज्ञापत्रात केंद्राचं म्हणणं म्हणजे ओबीसींवर अन्याय आहे. राज्य सरकारचा अध्यादेशाद्वारे ओबीसी आरक्षण काही प्रमाणात देण्याचा प्रयत्न आहे. अध्यादेश सुधारित करुन राज्यपालांकडे पाठवला आहे. राज्यपाल त्यावर राज्यपाल निर्णय घेतील ही अपेक्षा असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला भाजप ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे हे त्यांनी दाखवून दिलंय अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. अध्यादेशालाही विरोध झाला. केंद्रही सांगतंय इम्पेरिकल डाटा देणार नाही. आता ओबीसी समाजच भाजपला जागा दाखवेल, अशी टीका पटोले यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!