Share

किरीट सोमय्यांना कोल्हापूरमध्ये पुन्हा ‘नो एन्ट्री’, ठराव मंजूर

Published On: 

कोल्हापूर : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा पुन्हा एकदा चर्चेचा ठरणार आहे. याचे कारण म्हणजे मुरगूड नगरपालिकडून सोमय्यांच्या प्रवेश बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुरगूड नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा झाली. सभेदरम्यान झालेल्या ठरावात किरीट सोमय्यांना एन्ट्री द्यायची नाही, असा ठराव एकमताने मजूर करण्यात आला आहे. दरम्यान, किरीट सोमय्या मुश्रीफांविरोधात तक्रार देण्यासाठी मुरगुड पोलीस ठाण्यात जाण्याच्या तयारीत असून सोमय्यांचा नियोजित दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने ठराव मंजूर केला आहे.

दरम्यान, सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लज साखर कारखान्यात १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. पुढे महाविकास आघाडीने देखील आक्रमक होत सोमय्यांना कोल्हापुरात न जाता कराडमध्येच थांबवले. परंतु यावेळी कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे समर्थक आणि मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता याच्याही पुढे जाऊन मुरगूड शहरात सोमय्या यांना कायमच्या प्रवेश बंदीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!