🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद आणि यावरून सुरु असलेले राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
‘अनेकांना असं वाटतं की, घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. मात्र दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.
चंद्रकांत पाटलांच्या या विधानाची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी खिल्ली उडवली आहे. ‘काँग्रेस नेत्यांचे भ्रष्टाचार काढणार या नवीन भविष्यवाणीआधी, ७२ तासात “माजी”चे “आजी” मंत्री होणार या चंद्रकांत पाटील यांच्या भविष्यवाणी चे काय झाले? देशात आज कुठेच कोणाचा शपथविधी झालेला दिसत नाही. आम्ही दादांना शुभेच्छा कशा द्याव्यात?’ असं म्हणत सावंत यांनी चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली आहे.
त्यामुळे सोमय्या व पाटील यांचे हे फुकटचे मनोरंजन म्हणून जनता पाहत आहे. ईडी, सीबीआयने सोमय्यांना फ्रेंचायझी दिली का? तक्रारी करायच्या तर करा पण चौकशीचे काम ही भाजपाच करणार का? काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप करायचे असतील तर फुसक्या लवंग्या नको दमदार करा! नौटंकीला जशास तसे उत्तर देऊ!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 20, 2021
पुढे ते म्हणाले, ‘कोविडमुळे राज्यात तसेही नाटक सिनेमी बंद आहेत. त्यामुळे सोमय्या व पाटील यांचे हे फुकटचे मनोरंजन म्हणून जनता पाहत आहे. ईडी, सीबीआयने सोमय्यांना फ्रेंचायझी दिली का? तक्रारी करायच्या तर करा पण चौकशीचे काम ही भाजपाच करणार का? काँग्रेसच्या मंत्र्यांवर आरोप करायचे असतील तर फुसक्या लवंग्या नको दमदार करा! नौटंकीला जशास तसे उत्तर देऊ!,’ असं चोख प्रत्युत्तर देखील सावंत यांनी दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- विराटच्या ‘त्या’ निर्णयाला सेहवागचा विरोध; म्हणाला, ‘याला काहीच अर्थ नाही’
- पहिल्यांदा रकुल प्रीत सिंह झळकणार आयुष्मान खुराना सोबत ‘या’ चित्रपटात
- किरीट सोमय्यांवरील कारवाईमागे मुख्यमंत्री की गृहखातं ? गृहमंत्र्यांनी पहिल्यांदाच केलं भाष्य
- काय कुणाला सोडलेलं नाही; अजित पवारांवरील ‘त्या’ केसेस सुरु आहेत – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
