Share

किरीट सोमय्यांवरील कारवाईमागे मुख्यमंत्री की गृहखातं ? गृहमंत्र्यांनी पहिल्यांदाच केलं भाष्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोल्हापूरकडे निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज पहाटे सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर कोल्हापुरात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे मंदिराबाहेरून दर्शन घेऊन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि इतर ठिकाणी जाऊन सोमय्या हे बेनामी मालमत्तेची पाहणी करणार असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस देखील कोल्हापुरात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

त्यामुळे संघर्ष टाळण्यासाठी सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाबंदी करण्यात आली. तर त्यांना मुंबईतच रोखण्यासाठी पोलिसांनी खूप प्रयत्न केले. कालपासून सुरु झालेल्या या घडामोडी अजूनही सुरु असून सोमय्या यांना आता पोलीस मुंबईत सोडण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने कायदा मोडून पोलिसांना हाताशी धरून दडपशाही सुरु केल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच गृहखात्याने पोलिसांना सूचना करून सोमय्यांविरोधात बेकायदेशीर कारवाई केल्याचा आरोप देखील भाजपने केला. यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ‘किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीवरुन किरीट सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली होती,’ अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली आहे.

‘साधारणतः अशी घटना होते, त्यावेळी वरिष्ठ अधिकारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना माहिती देतात. पण याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की, नाही. मला माहीत नाही. पण यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचा संबध नाही, याबात जो काही निर्णय घेतला, तो गृहमंत्रालयानं घेतला. ही वस्तूस्थिती आहे,’ असं दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!