Share

‘शरद पवारांचे नाव घ्यायची तुमची लायकी आहे का?’, मुश्रीफांचा सोमय्यांना संतप्त सवाल

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराडमध्ये पोलिसांनी रेल्वेतून उतरवलं. सोमय्यांनी तिथेच आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर सोमय्या यांनी टीका केली.

यानंतर आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. मुश्रीफ म्हणाले, ‘मला सोमय्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एकदा तक्रार केली आहे. मग त्या तपास यंत्रणा तपास करतील की, तुम्ही कशाला पर्यटन करायला जात आहात? तुरुंगात टाकणार, घोटाळेबाज असे म्हणण्याचा अधिकार यांना कोणी दिला? यावर आक्षेप घेत मी हायकोर्टात जाणार आहे. हे न्यायाधीश झाले का? तुम्हाला सुपारी दिलीये तर तुम्ही काम करा तुमचेय तक्रार करा. तपास यंत्रणांना तपास करु द्या. तुम्ही बदनामी का करत आहात? असा सवाल मुश्रीफ यांनी विचारला.

तसेच आमच्यावर आत्तापर्यंत एकही घोटाळ्याचा आरोप झालेला नाही. महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. पण ते होणार नाही. शरद पवारांचा काय संबंध आहे ह्यात? त्यांचे नाव का घेत आहात? त्यांचं नाव घ्यायची लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचं नाव घेत आहेत हे. हे बोलण्यापासून त्यांना रोखण्यासाठी मी उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!