Share

जम्मू काश्मीर पर्यटकांसाठी शंभर टक्के सुरक्षित; पर्यटन संचालकांनी दिली माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – जम्मू आणि काश्मीरमध्ये 75 नवीन पर्यटन स्थळे निश्चित करण्यात आली असून यातील काही ठिकाणी साहसी खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन संचालकांनी आज येथे दिली. जम्मू विभागाचे पर्यटन संचालक विवेकानंद राय आणि काश्मीर विभागाचे पर्यटन संचालक डॉ.जी.एन.ईटटू यांनी आज एका संयुक्त पत्रकार परिषदेत जम्मू आणि काश्मीरमधील नवीन पर्यटन सुविधांची माहिती दिली. जम्मू आणि काश्मीर हे पर्यटकांसाठी शंभर टक्के सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना डॉ.ईटटू म्हणाले की जम्मू आणि काश्मीरमध्ये परंपरागत पर्यंतनस्थळांच्या जोडीला नवीन 75 पर्यटन स्थळे निश्चित केली गेली आहेत. ही सर्व पर्यटन स्थळे आजवर दुर्लक्षित राहिली होती, येथे पर्यटकांसाठी सुविधा नव्हत्या. मात्र आता केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या मार्गदर्शनात नवीन पर्यटनस्थळांच्या सुविधांचा विकास सुरू झाला आहे. यात अनेक ठिकाणी साहसी खेळांच्या सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत. तसेच कुटुंबासह पर्यटनास येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. साहसी क्रीडांसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी तंबूतील निवासासह निसर्ग पर्यटनाच्याही व्यवस्था निर्माण केल्या गेल्या आहेत. हिमक्रीडांसाठीही पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत.

जम्मू आणि काश्मीरमध्ये पक्षी निरीक्षण, अभयरण्यासह निसर्ग पर्यटनाचे विविध पर्याय उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील सांस्कृतिक वारसा म्हणजे येथील प्राचीन घरे व इमारती हेदेखील पर्यटकांसाठी एक आकर्षण असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील हस्तकला आणि उत्तम अगत्यशीलता या पर्यटकांनी अनुभवण्याच्या गोष्टी आहेत असेही ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमधील केशराची शेती, फळबागा हेदेखील पाहण्यासारखे आहे असे डॉ.ईटटू यांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटन आणि अन्य संबंधित व्यवसायातील सेवा पुरावठादारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जात असून त्यामुळे पर्यटकांना जम्मू आणि काश्मीरमधील प्रवासाचा उत्तम संस्मरणीय अनुभव मिळेल अशी माहिती डॉ.ईटटू यांनी यावेळी दिली. राज्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी संगीतले.

नवीन चित्रपट धोरण

जम्मू आणि काश्मीर एकेकाळी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी ओळखले जात होते. ते अव्वल स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी नायब राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली नवीन चित्रपट धोरण आखण्यात आले आहे. त्याअंतर्गत एक खिडकी योजना राबवली जात असून चित्रीकरणासाठी सर्व परवानग्या एकाच ठिकाणी एकाच वेळी उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहितीही डॉ. ईटटू यांनी दिली.

कोविड नियमावलीचे पूर्ण पालन

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात कोरोनाची दुसरी लाट आल्याने जेव्हा दुसरा लॉकडाऊन लावण्यात आला त्याचवेळी जम्मू आणि काश्मीर मात्र या दुसऱ्या लाटेपासून मुक्त राहिले अशी माहिती त्यांनी दिली. जम्मू आणि काश्मीर मध्ये कोविड नियमावलीचे पूर्ण पालन केले जात असून पर्यटन व्यवसायातील 95 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे असे डॉ. ईटटू यांनी सांगितले. तर पर्यटन विभागाच्या शंभर टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून पर्यटकांनी न घाबरता जम्मू आणि काश्मीरमध्ये यावे असे आवाहन त्यांनी केले. जम्मू आणि काश्मीर हे एकमेव राज्य आहे जेथे पर्यटकांनाही लस उपलब्ध करून दिली जात आहे अशी माहितीही त्यांनी दिली. विमानतळ, रेल्वे व बस स्थानकात शीघ्र चाचणीद्वारे पर्यटकांची तपासणी केली जाते. जर कोणा पर्यटकांना लक्षणे आढळली तर त्याच्या उपचाराची व्यवस्था केली जाते तसेच विलगिकरणाचीही व्यवस्था केली जाते.

जम्मू आणि काश्मीर पर्यटन महोत्सव

येत्या 20 ऑक्टोबर पासून पुढील तीन महिने जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटन महोत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती जम्मू विभागाचे पर्यटन संचालक श्री. विवेकानंद राय यांनी यावेळी दिली. यात धार्मिक पर्यटनासोबतच हाऊस बोट महोत्सव, सरोवर महोत्सव, केशर महोत्सव आदींचा समावेश आहे. आगामी नवरात्री, दुर्गापूजा, दसरा, दिवाळी आणि सण हे राष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिथयश व्यक्तींच्या उपस्थितीत साजरे केले जाणार असल्याची माहिती श्री विवेकानंद राय यांनी दिली.

जम्मू आणि काश्मीर हे पर्यटकांसाठी आपल्या स्वतःच्या घराइतकेच सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटकांविरुद्धचे गुन्हे शून्य टक्के असून पर्यटकांसाठी जम्मू आणि काश्मीर देशातील सर्वात सुरक्षित ठिकाण असल्याचे विवेकानंद राय यांनी सांगितले.  राज्यात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून कोविडसह इतरही आजार नियंत्रणात आणण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी जम्मू आणि काश्मीर ट्रॅव्हल एजंट असोसिएशन चे अध्यक्ष श्री फारूक कुथू हेदेखील उपस्थित होते. जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटनाच्या जनक असलेल्या राजा राणी ट्रॅव्हल्स च्या अभिजित पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!