🕒 1 min read
परतूर – परतूर तालुक्यातील येनोरा ( जि. जालना ) येथील सदाशिव भुंबर या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत, यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सरकारला आवाहन केले आहे.
संभाजीराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाजातील तरूण मुख्य प्रवाहातून बाहेर पडला आहे. या तरूणांना सक्षम करण्यासाठी आम्ही समाजाच्या वतीने शासनाकडे आरक्षणासह सारथी संस्था, आण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या माध्यमातून उच्चशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व व्यवसाय उपलब्धता यांसारख्या इतर अनेक मागण्या केलेल्या आहेत. त्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलने केली. मात्र शासनाकडून त्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. वेळोवेळी समाजाच्या पदरी निराशाच पडत आहे.
आरक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, व्यवसायासाठी पाठबळ नाही यामुळे अनेक मराठा तरूण नैराश्यात जात आहे. त्या न्यूनगंडातूनच आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते. देशाचे भविष्य असणारी तरूण पिढी अशा परिस्थितीत जाणे, हे राष्ट्रास अहितकारक आहे.
प्रशासनातील काही अधिकारी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारला अर्धवट माहिती देऊन सरकारची दिशाभूल करीत आहेत, असे म्हणत संभाजीराजे यांनी सरकारला सूचना केली आहे कि सरकारने आता तरी जागे व्हावे व याविषयात जातीने लक्ष घालावे. अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही सुरू करावी. तसेच समाजाच्या इतर मागण्यांवर ठोस कार्यवाही करून तातडीने अंमलबजावणी करावी.
सदाशिव भुंबर यांस श्रद्धांजली अर्पण करून संभाजीराजे यांनी समाजातील तरूणांना कळकळीची विनंती करत म्हणाले की मी तुमच्यासाठी सदैव लढायला तयार आहे, तुमचे धैर्य हिच समाजाची ताकद आहे. त्यामुळे कुणीही हिम्मत हरू नका. असा मार्ग निवडू नका. आपले न्याय्य हक्क मिळविण्यासाठी व भावी पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण एकजुटीने व धैर्याने लढा देऊ असे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्य सरकार मागास प्रवर्गासाठी जो सुधारित अध्यादेश काढणार आहे तो नेमका आहे तरी काय ?
- संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या तयारीला लागावं, युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय : पुरुषोत्तम खेडेकर
- भाजप-संभाजी ब्रिगेड युतीची चर्चा; संतोष शिंदे म्हणाले, ‘वैचारिक लढा चालूच राहील,परंतु…’
- ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची; जावेद अख्तर यांनी केलं कौतुक
- तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
