🕒 1 min read
नवी दिल्ली : फुटबॉल जगतातील मोठे नाव लिओनेल मेस्सीला कोप अमेरिका जिंकल्यानंतर मैदानावर अश्रू गाळताना पाहून जगाने पहिले होते. आपल्या कारकिर्दतील सरावात मोठ्या विजयांपैकी एक असे त्याला मानले गेले होते. ब्राझीलला १–० पराभूत करत अर्जेंटिनाच्या संघाने आपला विजय आनंदाश्रूने साजरा करताना चाहत्यांनी पहिले होते. वर्ल्ड कप क्वालिफायिंग साठी झालेल्या या सामन्यात विजय मिळवल्यानंतर मेस्सी भावुक झालेला दिसला.
गुरुवारी वर्ल्ड कप साठी झालेल्या सामन्यात अर्जेंटिना संघाने बोलिविया संघाला ३-० ने पराभूत केले. सामन्यात झालेले तिन्ही गोल मेस्सीनेच केले आहेत. अर्जेंटिना जेव्हा कोपा अमेरिका जिंकली तेव्हा अर्जेंटिनाचे चाहते तिथे उपस्तिथ नव्हते. मात्र इथे चाहत्यांच्या समक्ष मेस्सीने आपल्या भावना मोकळ्या केल्या. हा विजय जणू कोप अमेरिकेचा उरलेला भाग होता असे जाणवत होते. यावेळी त्याच्या सहकारी खेळाडूंनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र मेस्सीचे आनंदाश्रू थांबता थांबत नव्हते.
बोलिव्हिया विरुद्ध हॅट्रिक गोल करत लिओ मेस्सीने पुन्हा एक विक्रमाची नोंद केली आहे.त्याने पेलेचा ५० वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये सर्वात जास्त गोल करणारा दक्षिण अमेरिकन खेळाडू म्हणून आता मेस्सीची नोंद झाली आहे. याआधी हे नाव पेले यांचे होते. मेस्सीने आतापर्यंत १५३ सामन्यात ७९ गोल केले आहेत. तर पेले यांनी ९२ सामन्यात ७७ गोल केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?
- रुग्णालयात नर्सच्या वेशात आली आणि बाळ पळवून गेली; पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- साकीनाका बलात्कार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविणार- नवाब मलिक
- ‘सरकारमध्येच महिलांची पिळवणूक करणारे बसलेत, मग गुन्हेगारांना धाक कसा असेल?’

