🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना अश्रू अनावर झाले आहेत. चित्रा वाघ यांनी पीडित महिलेची रुग्णालयामध्ये भेट घेतली. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र खवळून उठला आहे.
साकीनाकामधील पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. साकीनाकामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी निश:ब्द आहे. राक्षसी पद्धीतीने महिलेवर झालेल्या अत्याचार झाला ते कुठे तरी थांबलं पाहिजे. माफ कर ताई, आम्हाला तू कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही, असं म्हणत चित्रा वाघ भावूक झाल्या. त्यांना या घटनेवर बोलताना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून १ नंबर आहे. लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना. महाराष्ट्रातील महिलेंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असं म्हणत चित्रा वाघ प्रशासनावर आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. या प्रकरणी आरोपी मोहन चौहान (वय ४५) याला घटनेनंतर अटक करण्यात आली आहे.
पीडित महिलेवर ९ सप्टेंबरला रात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. महिलेचं आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. चाकूने हल्ला देखील करण्यात आला होता. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही, तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकत नाही असं राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र आज अखेर या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?
- भारतीय खेळाडू घाबरण्यामागचं कार्तिकने सांगितलं ‘हे’ कारण
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
