🕒 1 min read
मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. तालिबान विषयी आपले मत व्यक्त करताना जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल या संघटनांवर देखील टीका केली होती. यावेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली. त्यानंतर आता जावेद अख्तर यांनी तालिबानला समर्थन देण्यास तयारी दाखवलेल्या कथित सभ्य आणि लोकशाही देशांना खडेबोल सुनावले आहेत.
Every decent person ,every democratic government every civilised society in the world should refuse to recognise and condemn Talibans for their ruthless repression of Afgan women or let’s forget the words like justice , humanity and conscience.
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) September 10, 2021
जावेद अख्तर यांनी ट्विट करत तालिबानी सत्तेला पाठिंबा देणाऱ्या देशांना खडेबोल सुनावले आहे. “प्रत्येक सभ्य व्यक्ती, लोकशाही प्रधान सरकार, जगातील प्रत्येक समाजानं तालिबान्यांना मान्यता देण्यास नकार द्यायला हवा. अफगाणिस्तानातील महिलांवरील अन्यायाबाबत सर्वच देशांनी निंदा केली पाहिजे अन्यथा न्याय, माणुसकी आणि विवेक हे शब्द विसरा’, अशी कडक शब्दात अख्तरांनी आपले मत मांडले आहे.
The spokesperson of Taliban has told the world that women are not meant to be ministers but to stay at home and bear children but the so called civilised and democratic countries of the world are willing to shake Talibani hand . What a shame .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) September 10, 2021
तसेच पुढे तालिबानी प्रवक्ता सय्यद झकीरुल्लाह यानं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत म्हंटल होत की, ‘तालिबानी प्रवक्त्यानं जगाला सांगितलं की महिला मंत्री बननण्याचा लायकीच्या नाही. त्या फक्त मुलांना जन्म घालण्यासाठी आहेत.’ यावर देखील जावेद अख्तर यांनी भाष्य केले आहे. जावेद अख्तर म्हणाले की, ‘महिलांबाबत असं विधान करणाऱ्यांच्या सरकारला मान्यता देण्याची तयारी कथित लोकशाही प्रधान देशांनी केली आहे ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे’, सध्या जावेद यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत असून अनेकांचे याकडे लक्ष वेधले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महेबूब शेख यांच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन जयंत पाटील यांच्या संमतीनेच ?
- भारतीय खेळाडू घाबरण्यामागचं कार्तिकने सांगितलं ‘हे’ कारण
- पवारांकडून त्यांचं ‘करेक्ट वर्णन’, काँग्रेस जुन्या पुण्याईवर जगतेय- देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे
- भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
