🕒 1 min read
पुणे – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा शर्मा या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांचा परळी दौरा चांगलाच वादात सापडला असून आता भाजपने या प्रकरणात थेट भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा शर्मा या एकट्या लढत असून भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा या त्यांच्या पत्नी आहेत व त्यांना धनंजय मुंडे यांच्यापासून दोन मुले झाल्याची जाहीर कबुली दिली आहे. करुणा शर्मा या परळी येथे गेल्यानंतर त्यांना गुन्ह्यात गोवण्यात आले. त्यांच्या बनावट आवाजात क्लिप तयार करून व्हायरल करण्यात आली. त्यांच्या गाडीत एक महिला पिस्तूल ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
त्यांच्या गाडीच्या चालकावरही अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केली आहे. ॲट्रॉसिटी कायद्याचा इतका दुरुपयोग कधी पाहिला नव्हता. करुणा शर्मा एकट्या लढत आहेत. अशा स्थितीत भाजपा करुणा शर्मा यांच्या पाठीशी राहील. त्यांना न्यायालयात साथ देणे व त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत विचार करेल असं पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमत आहे तरीही प्रशासन कामे अडवत आहे. सभा तहकुबी ही सुरुवात आहे. प्रशासन काम करू देत नसेल तर भाजपाला आंदोलन करावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाला दिलासा नाहीचं! जावेद अख्तर प्रकरणात होणार कारवाई
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- तालिबान सरकारसाठी चीनने केली ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
