मुंबई : गेल्या दीड वर्षापासून आपण सर्वजण कोरोना संसर्गाला सामोरे जात आहोत. कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरतांना दिसून येत आहे. मात्र, या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या नातेवाईकांसह जवळच्यांना गमावलेले आहे. दुसरी लाट ओसरत असतांनाच संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे.
त्यातच आता आता सर्वांसाठीच पर्वणी असणारा गणेशोत्सव सुरू होत आहे. पुण्यात गणेशोत्सव सार्वजनिकरित्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेऊन प्रत्येकाने काळजी घेत आपली जबाबदारी ओळखणे क्रमप्राप्त आहे. तर आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
‘गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे आम्ही घेतलेला ॲानलाईन दर्शनाचा निर्णय योग्य आहे. लोक नियम पाळत नाही, गर्दी वाढते. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. मुंबईतील लालगाबगचा राजासह राज्यातील सर्व सार्वजनिक मंडळात फक्त ॲानलाईन दर्शन बंधनकारक असेल.’ अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी आता दिली आहे.
त्यामुळे आता यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केल्यास आपण सर्वजण मिळून पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा करू, त्यामुळे ‘महाराष्ट्र देशा’ तुम्हाला एवढेच आवाहन करत आहे कि, यंदाच्या गणेशोत्सवात शासनाने लागू केले सर्व नियम पाळा आणि कोरोनाचा धोका टाळा.
महत्त्वाच्या बातम्या
- देशवासीयांना मिळणार लवकरच नाकाद्वारे कोरोना लस; एम्समध्ये होणार क्लिनिकल ट्रायल
- ‘लोकांचा आक्रोश मी पाहिलाय, त्यांना कसं आवरलं हे मला माहिती; सरकारला तोडगा काढायचा नाही का?’
- राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्रे आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- कंगनाचे ‘थलायवी’ चित्रपटाचे प्रमोशन; शेअर केला साऊथ इंडियन लुक

