🕒 1 min read
औरंगाबाद : महापालिकेत दोन आरोग्य वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने राजकारण सुरू होते. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले डॉ. पारस मंडलेचा यांना कार्यक्रमासाठी डावलल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता पुन्हा एकदा या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. प्रतिनियुक्तीवर आलेल्या डॉ. पारस मंडलेचा यांच्याकडे वैद्यकीय अधिकारी या पदाचा पूर्ण कार्यभार प्रशासकांच्या आदेशानुसार आता सोपविण्यात आला आहे.
राज्य शासनाने डॉ. पारस मंडलेचा यांची बीड येथून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर दोन महिन्यांपूर्वी बदली केली आहे. त्यानुसार महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार त्यांच्याकडे देणे अपेक्षित होते. पण महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर व डॉ. मंडलेचा यांच्यात कामाची विभागणी करून दोघांची एकाच पदावर नियुक्ती केली. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये आरोग्य विभागात दोघांत शितयुद्ध सुरू असल्याचे चित्र आहे.
बजाज कंपनीतर्फे देण्यात आलेल्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. मंडलेचा यांना डावलण्यात आले होते. आता मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी-१ व आरोग्य वैद्यकीय अधिकारी-२ यांच्या मध्ये आरोग्य विभागातील कामकाजाची विभागणी बाबतचे आदेश रद्द करण्यात येऊन कार्यालयीन आदेश जा क्र/ मनपा/ आस्था १/ २०२१/१२५५ ३ सप्टेंबर रोजी डॉ. पारस मंडलेचा यांच्याकडे आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदाचा पूर्ण कार्यभार सोपवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन – राजू शेट्टी
- ‘करुणा शर्मांविरुद्ध कटकारस्थान ; एखादा मंत्रीच जर अन्याय, अत्याचार करत असेल तर…’
- गेल ऑम्व्हेट यांचे पुण्यात स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले
- औरंगाबाद ग्रामीण भागात पाचवी ते सातवीच्या वर्गांची घंटा वाजली!
- राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक बुधवारी; शरद पवार स्वतः घेणार आढावा

