Share

दिलासादायक : कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या ‘या’ औषधाच्या वापराला मंजुरी

Published On: 

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती त्यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यातच आता देशात कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी भारतात टोसिजिजुमॅबच्या औषधाला वापरासाठी डीसीजीआयकडून मंजुरी देण्यात आल्याचं हेटेरो कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे.

कंपनीने देशात मेंटोसीलिजुमॅब (टोसीरा) औषधाला मिळालेली मंजुरी आपल्यातील तांत्रित क्षमता आणि कोविड विरुद्धच्या लढ्यासाठीची कटिबद्धता दाखवून देणारी आहे. औषधाच्या समान वितरण पद्धत सुनिश्चित करण्यासाठी सरकारसोबत एकत्रितरित्या काम करू, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!