Share

किसान महापंचायतीला भाजप नेते वरूण गांधी यांनी दिला पाठिंबा, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये संयुक्त किसान मोर्चा संघटनेच्या वतीने आज किसान महापंचायत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील सर्वात मोठ्या GIC मैदानात ही पंचायत आयोजित करण्यात आली आहे. देशातील विविध राज्यातून याठिकाणी शेतकरी सहभागी झाले आहेत.

भाजप नेते वरूण गांधी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. महापंचायतीची एक व्हीडिओ क्लिप ट्विटरवर शेअर करताना वरूण गांधी म्हणाले, ‘मुजफ्फरनगरमध्ये आज लाखो शेतकरी आंदोलनासाठी जमा झाले आहेत. तीसुद्धा आपलीच माणसं आहेत. आपण त्यांच्याशी आदरपूर्वक पद्धतीने संवाद साधण्याची गरज आहे. त्यांचं दुःख आणि मुद्दे समजून घेण्याची गरज आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे.’ असे मत त्यांनी ट्वीट करून माडले आहे.

दरम्यान आता मुजफ्फरनगरमध्ये होणाऱ्या महापंचायतीसाठी शेतकऱ्यांची गर्दी जमली आहे. जिल्ह्याची सीमा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष चौधरी नरेश टिकैत अनेक खापांच्या चौधरी पंचायतीच्या ठिकाणी उपस्थित आहेत. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत हेही महापंचायतीवर आले आहेत आणि ते केंद्र सरकारवर सतत हल्लेखोर आहेत. जोपर्यंत हे आंदोलन यशस्वी होत नाही तोपर्यंत आपण घरी परतणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!