🕒 1 min read
पुणे : मागील वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने सर्वसामान्य माणसांवर आर्थिक संकट ओढवले. अनेक लोक बेरोजगार झाले. यामुळे चिंता व्यक्त होत आहे. मात्र आता नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज पुणे येथे विविध पदांसाठी जागा रिक्त आहेत.
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://law.dypvp.edu.in/ या लिंकवर क्लिक करून अर्ज भरू शकता. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2021 असणार आहे.
प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदासाठी UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक असणार आहे. तर उमेदवार डॉ. डी. वाय. पाटील लॉ कॉलेज, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे, महाराष्ट्र 411018. या पत्यावर देखील ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रामीण भागातील पाणी प्रश्न मिटणार, मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा
- मराठा आरक्षणातील अडसर दूर होणार ? संभाजीराजेंनी राष्ट्रपतींकडे केल्या ‘या’ २ महत्वाच्या मागण्या
- संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वार्ड करा – गोऱ्हे
- बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
- ‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो’

