🕒 1 min read
नागपूर : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार त्यांना 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.
अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होत असून ईडीने सकाळपासूनच धाड सत्र सुरु केलं आहे. आता ईडीने परब यांना आणखी एक धक्का दिलाय. अनिल परब यांच्या प्रकरणाशी संबंधीत नागपूरमध्ये ईडीने छापासत्र सुरू केले आहे. नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या कार्यालयात व घरी ईडीने कारवाई केली आहे. ते परब यांच्या जवळचे मानले जातात. याबाबत एका खासगी वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.
अनिल परब आणि बजरंग खरमाटे यांनी संगनमताने करोडो रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आणि 25-30 लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केले असल्याचेही सोमैय्या यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.
परब-राऊत यांची धावती भेट –
अनिल परब हे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी सामना कार्यालयात आले होते. १० मिनिटे या दोन्ही नेत्यांच्यात चर्चा झाल्यानंतर परब पुन्हा घाईघाईने निघून गेले. दरम्यान, या भेटीनंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘अनिल परब हे माझे शिवसेनेतील सहकारी आहेत. ते मंत्री देखील आहेत. त्यामुळे आमची कायम भेट होत असते,’ असं राऊत यांनी म्हटलं. तसंच, कायदेशीर लढाई या कायदेशीरच लढल्या जातील. परब हे कायदा क्षेत्रातील जाणकार आहेत, स्वतः ते वकील आहेत. त्यामुळे त्यांना माहितीये काय करायचं आहे ते.’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल परब उद्या चौकशीला हजर राहणार ? परब-संजय राऊत भेटीनंतर राऊतांनी केलं ‘हे’ भाष्य
- नितेश राणेंनी केले ‘ते’ वादग्रस्त ट्वीट डिलीट; उलटसुलट चर्चांना आले उधाण
- ‘बंद है मंदिर, बंद पाठशाला, खुली है लेकीन ‘मधुशाला’; भाजप महिला मोर्चाचा हल्लाबोल
- मोदी सरकारने कष्टकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे; जन आशीर्वाद यात्रेचा उद्देश -खा. कराड
- ‘ईडीने कारवाई करावी, मात्र भाजप नेत्यांनी आरोप केल्यानंतर ते कारवाई करत असतील तर याचा अर्थ…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
