🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: बेळगावचा प्रश्न लोकशाहीने सुटत नसेल तर ठोकशाहीने सोडवू, असे शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते बेळगावमध्ये एका सभेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, आम्ही पाकिस्तानला नाही, बेळगावला जाण्याची परवानगी मागत आहोत. बेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील बेळगावसंबंधी कोर्टाचा निर्णय येत नाही, तो पर्यंत बेळगाव केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा. बेळगावचा विषय लोकशाही मार्गाने सुटला नाही तर आम्ही ठोकशाहीने प्रश्न सोडवू अशी आक्रमक भाषा राऊत यांनी केली.
राऊत पुढे म्हणाले, सध्या बेळगाव कर्नाटक सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. बेळगावमध्ये बहुसंख्य मराठीभाषिक जनता असून त्यांना महाराष्ट्रात यायचं आहे. कर्नाटक सरकार बेळगावमधील मराठी भाषिकांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
