Share

मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळ्याचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेला मंत्रालयातील उंदीर घोटाळ्याचा आरोप ताजा असतानाच एक नवीन आरोप समोर आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

संजय निरुपम म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालयात अल्पोपहारावर केलेला खर्च हा दरवर्षी दुपटीहून अधिक झाला आहे. माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार २०१५-१६ साली सीएमओमध्ये चहा आणि अल्पोपहारावर ५७ लाख ९९ हजार १५६ रुपये खर्च झाला होता. तो खर्च२०१६-१७ मध्ये एक कोटी २० लाख ९२ हजार ९७२ रुपयांवर पोहचला.

२०१७-१८ या वर्षात चहा आणि अल्पोपहारावर तीन कोटी ३४ लाख ६४ हजार ९०५ रुपये खर्च झाला. म्हणजे गेली तीन वर्षे प्रत्येक वर्षी चहा आणि अल्पोपहारावर खर्च वाढत गेल्याचं निरुपम म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!