Share

ठाकरे सरकारचा मराठवाड्यावर अन्याय, डॉ. भागवत कराड यांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मराठवाड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला आहे. नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालेले डॉ. कराड सध्या ‘जनआर्शिवाद’ यात्रेनिमित्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांची माहिती देत आहेत. त्यातच त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

मराठवाड्याच्या हितासाठी मागील देवेंद्र फडणवीस सरकारने ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ योजना मंजूर केली होती. मात्र, सध्याच्या ठाकरे सरकारने ही योजना बंद केली असून यामुळे मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील दुष्काळ कमी करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न होता, असेही ते म्हणाले.

‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील लहान-मोठे धरणे आप-आपसात जोडण्याची योजना आखण्यात आली होती. त्यामुळे ज्या भागात पाण्याची कमतरता आहे, त्या भागात पाणी पुरवठा करणे शक्य होणार होते. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्याने ही योजना सध्या थंड बस्त्यात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!