Share

वरुणराजा बरसला; पावसासाठी तरसलेला बळीराजा अखेर सुखावला!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : तब्बल एक ते दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील एक लाख २९ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना जीवदान मिळाले आहे. जुन महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली होती. तालुक्यातील पेरणीलायक क्षेत्रापैकी १०५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. मात्र महिन्यापासुन पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पिकांना धोका निर्माण झाला होता. सोमवारपासुन तालुक्यात पावसाने हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ५५० मिमी असुन मंगळवारी सरासरीच्या १८ टक्के (१७८ मिमी) पाऊस पडला. आतापर्यंत तालुक्यात सरासरी २३८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. लासुरगाव मंडळात सर्वाधिक ३४३ मिमी पावसाची नोंद झाली असुन लाडगाव मंडळात सर्वात कमी १८९ मिमी पाऊस पडला आहे. वैजापूर मंडळात २३० मिमी, नागमठाण १९३ मिमी, महालगाव २१६ मिमी, लोणी २०३ मिमी, शिऊर ३०७ मिमी, गारज २६७ मिमी, बोरसर, २४८ मिमी व खंडाळा मंडळात १९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे तालुक्यातील एक लाख २९ हजार २७४ हेक्टर वरील पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ६३२९७ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची पेरणी झाली आहे. त्या पाठोपाठ मका पिकाची ४१८०३ हेक्टर, बाजरी- ४७५९ हेक्टर, सोयाबीन – ५६०१, मुग – ४८१८ व तुर पिकाची २२९५ हेक्टर वर पेरणी झाली आहे. यंदा कापूस पेरणी क्षेत्रात घट झाली असून सोयाबीन पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!