Share

तालिबानची भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी तुलना केल्याने समाजवादी पक्षाच्या खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

लखनौ – अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर जगभरात चर्चा सुरू आहेत. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर गोंधळ माजल्याचं चित्र दिसून येत आहे. तसेच, महिलांचे हक्क आणि त्यांचं संरक्षण याविषयी देखील जागतिक स्तरावरून चिंता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर एकीकडे तालिबानच्या कृत्याचा अनेक देश निषेध करत असताना आणि भारतासाठी तालिबान ही अजूनही दहशतवादी संघटनाच असताना लोकसभेतील एका खासदाराने तालिबानच्या या कृत्याचं कौतुक केलं आहे. या संघटनेने रशिया, अमेरिकेसारख्या ताकदवान देशांना त्यांच्या देशात थांबू दिलं नाही असं सांगत त्यांनी तालिबानींचे कौतुक केले.

तालिबान्यांनी आपला देश स्वतंत्र केला असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रेहमान बर्क यांनी केले आहे. त्यामुळे बर्क यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. जेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा संपूर्ण देश स्वातंत्र्यासाठी लढला होता. त्यांना स्वतंत्र व्हायचं आहे. ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. आपण त्यात हस्तक्षेप कसा करू शकतो? असा सवाल खासदार बर्क यांनी केले आहे.

या वक्तव्यानंतर बर्क यांच्याविरोधात संभल सदर कोतवालीमध्ये  भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 153 A, 124 A, 295 A अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फक्त बर्कच नव्हे अनेक लोकांनी अशाच प्रकारे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!