मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लादले होते. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारकडून अनेक निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स, उद्यानेही खुली करण्यात आली आहे. मात्र राज्यातील मंदिरे अद्यापही खुली करण्यास परवानगी मिळाली नाही. यावरुन भाजप राज्य सरकारवर वारंवार टीका करत आहे. यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांना चांगलाच चिमटा काढला आहे.
‘महाराष्ट्रातील मंदिरे उघडी केली नाही. राज्याबाहेरची मंदिरे सुरु आहेत. तिथे काळजी घेतली जातेय. पण मंदिरे सुरु करण्यापेक्षा विरोधकांनी दिल्लीतून व्हॅक्सिन आणण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असा चिमटा महापौर पेडणेकरांनी काढला आहे.
‘महानगरपालिकेच्या रुग्णालयात राज्याला केंद्राकडून आलेले डोस दिले जातात. सुराना, रिलायन्सने फुकट लस दिली. महानगरपालिकेच्या प्रयत्नांना तितकं यश नाही. पण टोकाचे प्रयत्न आम्ही करत आहोत,’ असंही पेडणेकरांनी यावेळी त्यांनी सांगितलं.
‘पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यामुळे गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुराना सेठिया रुग्णालयाचं नाव आलं आहे. कमी दिवसांत जास्त व्हॅक्सिनेशन केल्याने ते शक्य झालं आहे. तसेच कोटक इंश्युरन्सने सीएसआरच्यामाध्यमातून दोन व्हेंटिलेटर दिले आहेत. ही काळाची गरज आहे. शिवसेनेला सामाजिक जबाबदारी सांगण्याची गरज नाही. समाजाचं आपण देणं लागतो. या भावनेतून आम्ही काम करतच असतो,’ असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- राज कुंद्राला कोर्टाकडून दिलासा; अटकपूर्व जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी
- भारतातील मुस्लिम लॉ बोर्डाकडून तालिबानचे कौतुक
- ‘राज्यपालांनी स्वतःचा पाय पुन्हा धोतरात गुंतवून घेतला’, संजय राऊतांची टीका
- ‘या’ कारणामुळे अनिल देशमुख ईडीसमोर गैरहजर, वकिलांचे स्पष्टीकरण
- ‘कोमार्य चाचणी विषय राष्ट्रीय पातळीच्या अभ्यासक्रमातून वगळावा’, अंनिसचे मंत्री भारती पवारांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
