🕒 1 min read
नाशिक – देशात कोणतीही व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये हे सरकारचे धोरण असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केलं. जन आशीर्वाद यात्रेच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं पत्रकार परिषदेत त्या काल बोलत होत्या.
देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसींचं उत्पादन करण्यात येत असून 55 कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन नव्यानं 23 हजार कोटींची तरतूद जाहीर करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. नवीन लसींना परवानगी देतांना विविध सुरक्षा मानांकनं, लसीच्या चाचण्या आणि परिणामकारकता याचा अभ्यास करूनच परवानगी देण्यात येते असं पवार म्हणाल्या.
दरम्यान, राज्यात काल 5 हजार 424 रुग्ण कोरोना मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत एकंदर 62 लाख 1 हजार 168 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96 पूर्णांक 87 शतांश टक्के एवढं झालं आहे. राज्यात काल 4 हजार 408 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचं निदान झालं. तर कोविड-19 मुळं 116 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात सध्या 61 हजार 306 रुग्ण उपचाराधीन आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अचानक नीरज चोप्राची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- योगी सरकारकडून पुन्हा एक नामकरण; आता ‘अलीगढ’ होणार ‘हरिगड’
- राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? ‘सामनातून’ टीका
- ‘दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा डेल्टा प्लसचा संसर्ग झाला ही बाब सत्य’; टास्क फोर्स प्रमुखांची कबुली

