Share

‘भारतात शांतता नांदावी यासाठी लोकसभा अध्यक्ष्यांचे तिरुपतीला साकडे’

Published On: 

🕒 1 min read

आंध्र प्रदेश: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारतात शांतत नांदावी यासाठी तिरुपतीला साकडे घातले. यावेळी त्यांनी तिरुपती मंदिराला भेट देत दर्शन घेतेले. दरम्यान तिरुपती मंदिर संस्थानकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

‘शांत आणि समृद्ध भारत आणि लोकांच्या कल्याणासाठी तिरुमाला मंदिरात भगवान वेंकटेश्वर स्वामींना ओम बिर्ला यांनी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी ‘परमेश्वराचे दर्शनच आंतरिक शांतीची भावना देते’.असे त्यांनी म्हटले. दरम्यान यावेळी ते मंदिराचे वास्तुशिल्प सौंदर्य, त्याची भव्यता यात ते मोहून गेले.

दरम्यान संसदेतील गोंधळ, पेगासस प्रकरणावरून विरोधकांनी घातलेला प्रचंड गोंधळ, मार्शल प्रकरण यामुळे पहिल्यांदा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना रडू कोसळले. संसदेचा अपमान, प्रतिष्ठा भंग करण्यात आला. यासर्व प्रकरणानंतर आपल्याला झोप आली नाही असे वक्तव्य ओम बिर्ला यांनी केले होते. यासर्व प्रकरणानंतर संसदेचा मर्यादाभंग झाल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला. दरम्यान पहिल्यांदा संसदेत  एवढा गोंधळ झाल्याची घटना घडली. दरम्यान या प्रकरणानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तिरुपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भारतात शांतता नांदावी यासाठी तिरुपतीला साकडे घातले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!