Share

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या… थोडी तरी लाज बाळगा….; भाजपचा देशमुखांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाहीये. देशमुखांच्या मागण्या कोर्टाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता देशमुखांचा शेवटचा पर्यायही बंद झाला आहे. देशमुखांविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत देशमुखांनी कोर्टात याचिका केली होती.

याचिकेत देशमुखांनी म्हटले होते की, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपासाला स्थगिती द्यावी, ईडीने पाठवलेले समन्स रद्द करावेत, अटकेसारखी गंभीर कारवाई करण्यास मनाई करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या होत्या. पण सर्वोच्च न्यायालयाने देशमुखांची याचिका फेटाळली. आपण याबाबत सीआरपीसीच्या अनुषंगाने याचिका करावी, अशी सूचना न्यायालयाने केली आहे.

दरम्यान, देशमुख अडचणीत आल्यानंतर आता भाजप पुन्हा आक्रमक झाली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत देशमुख यांना डिवचले आहे. महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना ED चे समन्स चुकावल्यास अटक होणार का? ही चर्चा महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळल्या नंतर माजी गृहमंत्र्यांनी सरकारी यंत्रणांना सहकार्य करणे नीतिमत्तेला धरून होईल. थोडी तरी लाज बाळगा…. असा टोला त्यांनी देशमुख यांना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!